Department of Marathi

Marathi

' शिक्षण ' हे मानवी विकासाचे अत्यंत महत्त्वाचे प्रभावी क्षेत्र आहे. शिक्षणाने माणसाच्या, समाजाच्या सर्वांगीण विकासाची कवाडे उघडी व्हावी, वसईतील तरुण-तरुणींना उच्च शिक्षणासाठी मुंबईला जावे लागू नये, त्यांची होणारी परवड थांबवावी म्हणून वसईतील शिक्षणमहर्षी रे.फा. जॉन रुमाओ व वसईतील सर्व ख्रिस्ती बांधवांनी मुंबईतील आर्चबिशप कार्डिनल सायमन पेमेंटा यांच्याशी सल्लामसलत करून वसईत ' संत गोन्सलो गार्सिया ' महाविद्यालयाचा प्रारंभ १९८४ साली केला. वसईतील सर्व ख्रिस्तीवासियांच्या योगदानाची नोंद महाविद्यालयाच्या इतिहासात घेतली गेली आहे. या सर्वांच्यामुळेच वसई गावातच सर्व जाती-धर्मांच्या विद्यार्थ्यांना आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करण्याची सोय झाली, त्यामुळेच वसईचा आज शैक्षणिक कायापालट झालेला दिसतो आहे.